एल्गार न्यूज विशेष :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे गेल्या १८ वर्षांपासून सुरू असलेल्या सवेरा डिजिटलचे स्थलांतर तसेच एल्गार न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ दि. १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.
सवेरा डिजिटलची सुरूवात !
कुंभार पिंपळगांव व परिसरात २००५ मध्ये कॉम्प्यूटर ही एक प्रकारे नवीनच गोष्ट होती. तेव्हा परवेज पठाण यांनी सवेरा डिजिटल या नावाने मल्टिसर्विसेसचे दुकान सुरू करून कॉम्प्यूटर च्या माध्यमातून सेवा देण्यास सुरूवात केली होती. अर्थातच तेव्हा या गाव परिसरातील हा पहिलाच कॉम्प्यूटर होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कॉम्प्यूटर कसे असते, त्यात काय सुविधा असते एक उत्सुक्ता म्हणून अनेकजण कॉम्प्यूटर पहायला सुध्दा येत असत.
गेल्या जवळपास १८ वर्षांपासून सदरील सवेरा डिजिटल हे दुकान नियमितपणे सुरू आहे. मागील ३ वर्षांपूर्वी काही कारणास्तव सदरील दुकान हे मार्केट कमिटी समोर स्थलांतरीत करण्यात आले होते, परंतू आता पूर्वीच्याच ठिकाणी म्हणजेच स्वत:च्या कॉम्प्लेक्स मध्ये सवेरा डिजिटल चे स्थलांतर करून शुभारंभ करण्यात येत आहे.
एल्गार न्यूजची सुरूवात !
घनसावंगी तालक्यासह जालना जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध विषयांवर अर्थातच जनहिताच्या प्रश्नांवर नि:पक्ष, निर्भीड व रोखठोपणे लिखाण करता यावे, या प्रामाणिक उद्देशाने अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या एल्गार न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलला वर्षभरातच लाखो वाचकांनी भेट देवून बातम्या वाचल्या आहेत आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संपादकांनी १६ वर्षांपूर्वी पत्रकारितेची सुरूवात केल्यानंतर तसेच पत्रकारितेची पदवी (Bachelor of Mass Communication & Journalism) घेतल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत राहून समाजहिताच्या विविध विषयांवर लिखाण केले, मात्र लिखाणात येणाऱ्या काही मर्यादा लक्षात घेवून गेल्या वर्षी स्वत:चे ऑनलाईन न्यूज पोर्टल (एल्गार न्यूज) सुरू करून सडेतोडपणे लिखाण करण्यास सुरूवात केली आणि अवघ्या वर्षभरातच हे न्यूज पोर्टल लाखो वाचकांच्या पसंतीस पात्र ठरले.
डिजिटल मीडियाचे वाढते महत्व आणि कमी वेळेत सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्याच्या दृष्टीने एल्गार न्यूज पुढील वाटचाल करीत आहे. एल्गार न्यूज लवकरच व्हिडीओ फारमॅट मध्ये सुध्दा उपलब्ध होणार आहे, याकरीता अर्थातच चांगली क्वालिटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृ्ष्टीने पहिले आणि महत्वाचे पाऊल म्हणून संपर्क कार्यालय सरू करण्यात येत आहे.
शुभारंभ !
सवेरा डिजिटल आणि एल्गार न्यूजचा एकत्रित शुभारंभ दि.१ जानेवारी २०२५ रोजी सवेरा कॉम्प्लेक्स, बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर, कुंभार पिंपळगांव येथे सकाळी ११ वाजता होत आहे. या प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार, व्यापारी बांधव, व्यावसायिक, शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र मंडळींनी या प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन सवेरा डिजिटलचे संचालक तथा एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांनी केले आहे.
