Your Alt Text

भाडेकरूंच्‍या तपशीलाची माहिती द्यावी लागणार, नसता पोलीस कार्यवाही करणार ! | Online Registration of Tenants

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
Online Registration of Tenants : समाज विरोधी घटकांकडून अनेकदा शांतता भंग करून देशविरोधी कारवाया करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. समाजविरोधी घटक मानवी जीवनाला गंभीर धोका निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत असतात. सदरील समाजविरोधी घटक हे खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्‍तेला इजा पोहोचवण्‍याचाही प्रयत्‍न करतात.

दहशतवादी किंवा समाज विरोधी घटकांकडून विध्‍वंसक कृत्‍ये, सार्वजनिक शांतता भंग करण्‍याचा प्रयत्‍न किंवा दंगली घडवणे किंवा भांडणे इत्‍यादी प्रकार होवू नये यासाठी पोलीस प्रशासन वेळोवेळी सतर्कता बाळगत असते, मात्र आता अधिकची खबरदारी म्‍हणून पोलीस प्रशासनाने काही सक्‍तीची पाऊले उचलण्‍यास सुरूवात केली आहे.

अनेकदा असे दिसून आले आहे की, नागरिक भाडेकरू ठेवत असतांना त्‍याची कोणत्‍याही प्रकारची चौकशी न करता त्‍या संबंधित व्‍यक्‍तीला घर भाड्याने देत असतात, अनेकजण तर चार पैसे जास्‍त मिळत असल्‍यास संबंधित भाडेकरूची कुठल्‍याही प्रकारची चौकशी न करता सहज घर भाड्याने देत असतात.

विशेष करून महानगर किंवा मेट्रो शहरांमध्‍ये अधिकची काळजी घेणे आवश्‍यक असतांना भाडेकरूची चौकशी आणि पोलीस व्‍हेरिफिकेशन करणे टाळले जाते, परंतू आता असे करणे घरमालकाला महागात पडू शकते, कारण पोलीसांनी याबाबत स्‍पष्‍ट सूचना दिल्‍या आहेत.

दहशतवादी किंवा समाजविरोधी घटकांकडून कोणत्‍याही प्रकारचे विध्‍वंसक कृत्‍ये, दंगली, भांडणे, खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्‍तांचे नुकसान, मानवी जीवनाला धोका इत्‍यादी घडू नये यासाठी घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्‍यक करण्‍यात आली आहे.

कोणतेही घर, मालमत्‍ता, हॉटेल, गेस्‍ट हाऊस, लॉज, मुसाफीरखाना हा व्‍यवसाय करणाऱ्या जागा मालकाने कोणत्‍याही व्‍यक्‍तीला जागा राहण्‍यासाठी दिली असेल तर अशा भाडेकरूंचे सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर नोंद करणे आवश्‍यक आहे.

Online Registration of Tenants

ऑनलाईन शक्‍य नसल्‍यास जागा मालक प्रत्‍यक्ष पोलीस ठाण्‍यात जावून लेखी स्‍वरूपात सुध्‍दा भाडेकरूंची माहिती देवू शकतात. भाडेकरू व्‍यक्‍ती जर परदेशी असेल तर माल आणि परदेशी व्‍यक्‍ती यांनी त्‍यांचे नाव, राष्‍ट्रीयत्‍व, पासपोर्ट तपशील, ठिकाण, जारी करण्‍याची तारीख, वैधता, नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्‍याचे कारण नमूद करणे आवश्‍यक आहे.

सदरील आदेश तुर्तास मुंबई पोलीसांच्‍या अख्‍त्‍यारीत येणाऱ्या सर्वांसाठी लागू आहेत. या आदेशाचे उल्‍लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येणार आहे. शिवाय पोलीसांना भाडेकरूची खोटी अथवा चुकीची माहिती दिल्‍यास अर्जदार किंवा घरमालकावर सुध्‍दा कायदेशीर कारवाई होवू शकते.

संशयास्‍पद बाब पोलीसांनी कळवावी :-

फक्‍त मुंबईच नव्‍हे तर राज्‍यभरात जेथे कुठे काही संशयास्‍पद बाब दिसून आल्‍यास तात्‍काळ आपल्‍या जवळच्‍या पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकीला कळवावे, कारण आपल्‍या सतर्कतेमुळे होणारे नुकसान किंवा हानी रोखणे शक्‍य होईल.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

नियमित रोखठोक, निष्‍पक्ष व निर्भीड बातम्‍या व आर्टीकल आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!