Your Alt Text

परभणी जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू ! कायदा हातात घेवू नका, शांतता राखा – प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
परभणी शहरातील भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्या समोरील संविधानाच्‍या प्रतिकृतीचे मंगळवारी एका इसमाने नुकसान केल्‍याने घटनेच्‍या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी दि.११ रोजी बंद पुकारला होता, बंदला हिंसक वळण लागल्‍याने जिल्‍हाधिकाऱ्यांनी परभणी जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. विटंबना करणाऱ्या संबंधित इसमास पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

जमावबंदी आदेश !

पुढील कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न लक्षात घेवून तसेच शहर व जिल्‍ह्यात तणावाचे वातावरण निर्माण होवू नये यासाठी परभणी जिल्‍हाधिकारी यांनी परभणी शहर व जिल्‍ह्यात दि.११ रोजी दुपारी १ वाजल्‍यापासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्‍यानुसार परभणी शहर व जिल्‍ह्यात सार्वजनिक ठिकाणी ५ व्‍यक्‍तीपेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना जमा होण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे.

सदरील कालावधीत टेलिफोन, एसटीडी, भ्रमनध्‍वनी (मोबाईल), फॅक्‍स केंद्र, ध्‍वनीक्षेपके व इंटरनेट सेवा बंद करण्‍याबाबतही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे. सदरील निर्णय कायदा व सुव्‍यवस्‍थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही.

कायदा हातात घेऊ नका – प्रकाश आंबेडकर

परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्‍या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सर्व हल्‍लेखोर समाजकंटकांना तात्‍काळ अटक करा नसता त्‍याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्‍यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच कायदा हातात घेवू नये व शांतता राखावी असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी समाज बांधवांना केले आहे.


इतर बातम्‍या खाली पहा….

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!