Your Alt Text

घनसावंगी मतदारसंघाचे आता भवितव्‍य ठरणार ! निवडून आणा तो उमेदवार जो सर्वांगिण विकास करणार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
सर्वसामान्‍य मतदारांच्‍या काही आशा, आकांक्षा असतात, काही अपेक्षा असतात. आपण राहत असलेल्‍या गांव, शहरात आणि परिसरात आपल्‍याला मुलभूत सुविधा मिळाव्‍यात या माफक अपेक्षा असतात. मतदार जेव्‍हा राज्‍यात विविध मतदारसंघात किंवा देशात विविध ठिकाणी जात असतात तेव्‍हा त्‍या सुविधा आपल्‍या भागात सुध्‍दा असाव्‍यात तसा विकास आपल्‍या भागाचाही व्‍हावा, अशी त्‍यांची भावना असते. ज्‍या सुविधांसाठी इतरत्र फिरावे लागते त्‍याच सेवा, सुविधा आपल्‍याच भागात उपलब्‍ध झाल्‍यास अनेक अडचणी दूर होतील अशी मतदारांची भावना असते.

मतदारांनी कोणाला मतदान करावं आणि कोणाला आमदार बनवावं हे सर्वस्‍वी मतदारांवरच अवलंबून आहे. घनसावंगी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न, समस्‍या कोण सोडवू शकेल आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास कोण करू शकेल हे जनतेने अर्थातच मतदारांनी ठरवावं आणि मतदारसंघाचा आमदार निवडावा. परंतू मतदान करण्‍यापूर्वी काही प्रश्‍नांच्‍या आधारे मतदान केल्‍यास अधिक सोयीस्‍कर आणि सर्वांच्‍या हिताचे होईल असं म्‍हणायला हरकत नाही, त्‍यापैकीच काही प्रश्‍न आहेत जे मतदारांनी स्‍वत:ला विचारणे महत्‍वाचे आहे.

कोणता उमेदवार निवडून आल्‍यावर….

  • मतदारसंघातील सर्व गावांना जोडणारे (अनेक वर्षे टिकतील असे) मजबूत रस्‍ते करेल ?
  • मतदारसंघातील विजेचे सर्व प्रश्‍न मार्गी लावेल ?
  • मतदारसंघातील पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न मार्गी लावेल ?
  • मतदारसंघातील जनतेला शासनाच्‍या आधुनिक आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करेल ?
  • मतदारसंघात जवळपास 25 ते 30 गावांचा केंद्रबिंदू असलेल्‍या कुंभार पिंपळगांव सारख्‍या ठिकाणी ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करून सर्व आधुनिक आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करेल ?
  • तिर्थपुरी आणि घनसावंगी उपजिल्‍हा रूग्‍णालयात सर्व आधुनिक आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करेल ?
  • मतदारसंघातील चारही दिशेला असलेल्‍या गाव शिवारातील शेती ओलीताखाली आणण्‍यासाठी प्रयत्‍न करेल व पाण्‍याचे स्‍त्रोत निर्माण करेल ?
  • शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देवून त्‍यांच्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी प्रयत्‍न करेल ?
  • मतदारसंघातील ऊस उत्‍पादक व इतर शेतकऱ्यांना दिलासा देईल.
  • मतदारसंघातील जनतेच्‍या मुला-मुलींना आधुनिक व चांगल्‍या दर्जाचे KG to PG शिक्षण कमी खर्चात उपलब्‍ध करेल ?
  • मतदारसंघातील जनतेच्‍या मुला-मुलींना शहरातील विविध कोर्स व शिक्षण ग्रामीण भागात कमी खर्चात उपलब्‍ध करेल ?
  • मतदारसंघातील युवक-युवतींना रोजगार उपलब्‍ध करेल ?
  • मतदारसंघात Mini MIDC आणून उद्योगांना चालना देवून रोजगार निर्माण करेल ?
  • मतदारसंघातील युवकांना योजनांच्‍या माध्‍यमातून कर्ज उपलब्‍ध करून देईल ?
  • मतदारसंघातील शेतकरी, व्‍यापारी व युवकांना बॅंकांकडून विविध प्रकारचे कर्ज सहजतेने मिळेल यासाठी प्रयन करेल ?
  • मतदारसंघात नवनवीन प्रोजेक्‍ट आणून विकासाला गती देईल ?
  • महिला, माता भगीनींच्‍या समस्‍या किंवा प्रश्‍न सोडवेल ?
  • मतदारसंघातील जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देईल ?
  • सर्व शासकीय कार्यालयात ठराविक वेळेत जनतेची कामे व्‍हावीत यासाठी प्रयत्‍न करेल ?
  • मतदारसंघातील गावागावात सार्वजनिक वाहतूक सेवा (बस) सुरू करेल ?
  • मतदारसंघातील कुंभार पिंपळगावात पोलीस ठाणे मंजूर करून आणेल ?
  • गल्‍हाटी प्रकल्‍पाचा प्रश्‍न मार्गी लावून शेतकऱ्यांची अडचण दूर करेल ?
  • मतदारसंघातील जनतेला स्‍वस्‍त दरात वाळू उपलब्‍ध करून देण्‍यासाठी प्रयत्‍न करेल ?
  • सर्व जाती धर्माच्‍या नागरिकांना समानता आणि न्‍यायाच्‍या भुमिकेतून सहकार्य करेल ?
  • गोरगरीब, कामगार, शेतकरी, निराधार, कष्‍टकऱ्यांचा आधार बनेल ?
  • मतदारसंघात गुंडगिरीला थारा न देता भयमुक्‍त वातावरण निर्माण करेल ?
  • मतदारसंघातील युवकांना दारू व इतर व्‍यसनापासून दूर ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न करेल ?
  • मतदारसंघातील जनतेला आर्थिक दृष्‍़ट्या सक्षम करण्‍यासाठी प्रयत्‍न करेल ?
  • मतदारसंघातील जनतेला सहज भेटू शकेल आणि अहंकार व संकुचित वृत्‍ती न ठेवता जनतेची कामे करेल ?
  • मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्‍याची ज्‍याच्‍या मध्‍ये धमक असेल ?

अशा उमेदवारालाच आपले अमुल्‍य मत देवून घनसावंगी मतदारसंघाच्‍या सर्वांगिण विकासाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण पाऊल टाकावे. अर्थातच प्रत्‍येकाने मतदान आवश्‍य करावे आणि लोकशाहिचे महत्‍वपूर्ण कर्तव्‍य पार पाडावे. कारण निवडणुकीच्‍या या रणसंग्रामात घनसावंगी मतदारसंघाचे आता भवितव्‍य ठरणार असल्‍याने विचारपूर्वक मतदान करणे क्रमप्राप्‍त झाले आहे.

परवेज पठाण,
संपादक, एल्‍गार न्‍यूज


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!