एल्गार न्यूज विशेष :-
Maratha Aarakshan News Update : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दि.14 रोजी अंतरवाली सराटी येथे आयोजित केलेली विराट सभा रेकॉर्डब्रेक झाल्यामुळे सरकारसह सर्वपक्षीय नेत्यांचे इंडिकेटर लागले आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अंतरवाली सराटी येथे झालेली सभा अर्थातच रेकार्डब्रेक होती यात शंका नाही, राज्यभरातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव लाखोच्या संख्येने या सभेसाठी स्वर्खाने उपस्थित होते, या सभेला माता, भगीनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Maratha Aarakshan News Update
सर्व मराठा समाज बांधव स्वखचर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लांबचा प्रवास करून सभास्थळी पोहोचले होते, सभेत ऊन लागेल का ? जेवण – पाणी मिळेल का नाही ? आपली सोय होईल का नाही ? याची पर्वा न करता प्रत्येकजण सभेला पोहोचला होता. अर्थातच सभा यशस्वीपणे पार पडली.
विशेष म्हणजे ज्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून राज्यातील लाखो मराठा बांधव सभेला उपस्थित राहीले ते मनोज जरांगे पाटील हे काही आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री नाहीत किंवा एखाद्या पक्षाचे प्रमुखही नाहीत. ते एक सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहेत. तरीही त्यांच्या सभेला झालेली गर्दी न भुतो न भविष्यती अशाच प्रकारची म्हणावी लागेल.
मराठा आरक्षणासाठी त्यांनी निस्वार्थ भावनेतून उभा केलेला लढा कधी जनसागर मध्ये परावर्तीत झाला हे कोणालाच कळाले नाही. कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता फक्त समाजासाठी लढायचं या भावनेतून त्यांनी मराठा आरक्षणासाठी हाती घेतलेले जनआंदोलन राज्यभर पसरले आहे.
दि.14 रोजी झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी 24 तारखेपर्यंत आरक्षण द्या, नसता पुढील जबाबदारी सरकारची असेल असा इशारा दिला आहे. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.
कोणाचे इंडिकेटर लागले ?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आंतरवाली सराटी येथे लाखोंचा जनसागर उलटला, राज्यभरातील मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने सभेला उपस्थिती लावल्याने अनेकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.
सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, आमदार असो किंवा खासदार असो सर्वांचेच या भगव्या वादळामुळे इंडिकेटर लागल्याचे दिसून येत आहे. कारण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सर्व पक्षातील मराठा बांधव एकवटले आहेत, मराठा आरक्षणासाठी सर्वांनी आपला पक्ष बाजूला ठेवला आहे.
अर्थातच वेळ आल्यास पक्षाला नव्हे तर समाजालाच प्रथम प्राधान्य राहणार असून आरक्षणाला विरोध करणाऱ्या किंवा समर्थन न करणाऱ्या आमदार, खासदाराचाही राजकीय कार्यक्रम करण्याचीही मानसिकता दिसून येत आहे. त्यामुळे आपलं काय होणार हीच चिंता अनेक आमदार, खासदारांना वाटत असून अनेकांचे इंडिकेटर लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.