एल्गार न्यूज विशेष :-
How to Create Whatsapp Chennel : तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे, विविध कंपन्या सुध्दा आपल्या ग्राहकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत आहेत, जगभरात ज्याचा वापर आहे त्या व्हाट्सअॅपने सुध्दा आता आपल्या ग्राहकांना मोफत व्हाट्सअॅप चॅनल सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
व्हाट्सअॅप चॅनल म्हणजे काय ? | What is Whatsapp Channel ?
आपण व्हाट्सअॅपवर ग्रुप बनवतो हे आपल्याला माहितच आहे, परंतू व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये फक्त 1025 लोकांनाच अॅड करता येते, त्यामुळे आपल्याला विविध ग्रुप तयार करावे लागतात. मात्र आपल्याला जर लाखो लोकांना एकाच वेळी मॅसेज शेअर करायचा असल्यास अडचण येते.
परंतू आता व्हाट्सअॅपने चॅनलची सुविधा सुध्दा सुरू केली आहे. या माध्यमातून तुम्ही लाखो लोकांना या मध्ये अॅड करू शकता किंवा लिंक शेअर करून लोकांना अॅड होण्यास प्रोत्साहन देवू शकता, विशेष म्हणजे ज्यांचा चॅनल जास्त प्रसिध्द होत असतो त्या चॅनलला सर्च करून देशभरातील कितीही लोक जॉईन होवू शकतात.
तुमचा चॅनल शोधून अॅड होण्याची सुविधा कदाचित काही दिवसात सुरू होईल, मात्र सध्या तुम्ही स्वत: किंवा चॅनलची लिंक शेअर करून लोकांना अॅड करू शकता. विशेष म्हणजे या चॅनल मध्ये फक्त तुम्हीच मॅसेज करू शकता, इतर कोणालाही मॅसेज करता येत नाही.
तुम्ही कोणताही मॅसेज, फोटो, व्हिडीओ शेअर केल्यास चॅनल मध्ये जॉईन असलेल्या सर्वांना तो संदेश दिसतो. चॅनल मध्ये असलेल्या सर्वांपर्यंत हा मॅसेज पोहोचत असतो. ज्या प्रमाणे टेलिग्राम मध्ये चॅनलची सुविधा आहे त्याच प्रमाणे व्हाट्सअॅप मध्ये सुध्दा ही सुविधा देण्यात आली आहे.
व्हाट्सअॅप चॅनलचे फायदे | Whatsapp Channel Benefits
व्हाट्सअॅपचे चॅनलचे सर्वच क्षेत्रातील लोकांना फायदे आहे. राजकीय पक्ष, संघटना, वर्तमानपत्र, चॅनल, व्यापारी, कृषि क्षेत्र किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील नागरिक आपले चॅनल सुरू करून त्यात लोकांना अॅड करून आपली माहिती क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. ज्या प्रमाणे इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोवर्स असतात त्याच प्रमाणे चॅनलचे सुध्दा आहे.
व्हाट्सअॅप चॅनल कसे सुरू करावे ? | How to create Whatsapp Channel ?
व्हाट्सअॅप चॅनल सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचे व्हाट्सअॅप अपडेट केले आहे का ते पहा. जर अपडेट केले नसेल तर Play Store वरून अपडेट करून घ्या. त्यानंतर व्हाट्सअॅप उघडल्यावर तुम्हाला वर Update हे बटन दिसेल. (Whatsapp Business मध्ये बटन खाली असते)
Update ला क्लिक केल्यावर खाली Channels समोर + चे चिन्हे दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर Create Channel या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या चॅनलला नाव द्या, प्रोफाईल फोटो लावा. डिस्क्रीप्शन मध्ये चॅनल कशा बद्दल आहे त्याची माहिती लिहा. आता तुम्ही चॅनलची लिंक कॉपी करून विविध ग्रुप मध्ये शेअर करू शकता.
दुसऱ्यांचे चॅनल कसे शोधायचे ? | How to Find Channels
इतरांचे चॅनल शोधण्यासाठीही Update बटनावर क्लिक करून Channel समोरील + चिन्हाला क्लिक करा आणि Find Channels ला क्लिक करा. आता तुम्हाला अनेकांचे चॅनल दिसतील किंवा तुम्ही वर Search Box मधूनही चॅनल शोधू शकता.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.