एल्गार न्यूज :-
Manoj Jarange Patil Sabha : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या महाविराट सभेला लाखोच्या संख्येने समाज बांधव जाणार आहेत.
आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सदरील रॅकार्डब्रेक सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव, माता, भगीनी येणार आहेत. सभा एवढी विराट होणार आहे की, सध्या कोणालाही किती लाख बांधव येतील याचा अंदाज लावणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.
काय काळजी घ्यावी ?
सध्या उन्हाचा पारा चढलेला आहे, त्यामुळे अर्थातच सभेच्या दिवशी सुध्दा उन्हाची तिव्रता असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शक्यतो सर्वांनी सूती किंवा इतर रूमाल डोक्याला बांधावा, शक्य असेल तर छत्रीही सोबत आणता येईल. पाणी आवश्य जवळ ठेवावे.
शुगर बीपीचे पेशंट असणाऱ्यांनी शक्य असल्यास ओआरएस सोबत ठेवावे, धुळीचा त्रास झाल्यास शक्य असल्यास मास्क वापरावा असे आवाहन कुंभार पिंपळगांव येथील डॉ.गणेश तौर यांनी केले आहे.
अजून काय खबरदारी घ्यावी ?
“एल्गार न्यूज” च्या वतीनेही सर्वांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सभेला येतांना आणि जातांना वाहने सावकाश चालवावी, गाड्यांची रेस लावू नये, सभेला आल्यानंतर आपापली वाहने योग्य पध्दतीने लावावीत, शिवाय सभा संपल्यावर जातांनाही घाई करू नये.
सभा संपल्यावर बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे धीर धरावा, थोडा उशीर झाला तरी घाई किंवा गरबड करू नये. वाहने काढतांना एखाद्याला धक्का लागू नये याचा प्रयत्न करावा, अनावधानाने धक्का लागल्यास वाद होणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेला येतांना शक्यतो मौल्यवान वस्तू आणू नये, आणल्यास योग्य ते लक्ष ठेवावे, सभेला येतांना किंवा जाताना शक्यतो टपावर बसून धोकादायक प्रवास करू नये, डोक्याला रूमाल आवश्य बांधावा.
सभेला माता भगीनी येणार असल्यामुळे त्यांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शिवाय डॉक्टरांनी केलेल्या आवाहनानुसारही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन अथवा विनंती एल्गार न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे.
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.