एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते कल्याणराव तारडे यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या अंबड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, तसेच जालना जिल्हा पक्ष प्रभारी माजी आमदार नामदेवराव पवार, जिल्हा जालना काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या मान्यतेनुसार, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार कैलास गोरंट्याल, वकील राम कुऱ्हाडे (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), माजी आ. सुरेश जेथलिया, राजेंद्र राख, प्रभाकर पवार (उपाध्यक्ष जालना जिल्हा कमिटी) सुभाष मगरे (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी बदनापूर) यांच्या हस्ते अंबड काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सदरील नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अभिप्रेत असलेले पक्ष कार्य सर्वाना सोबत घेऊन व अंबड तालुक्यातील काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी माझे योगदान देईल, असे काँग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष कल्याणराव सुखदेव तारडे यांनी सांगितले.
कल्याणराव तारडे यांच्या निवडी बद्दल जाकीर भाई डावरगावकर (शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी अंबड), अब्दुल रफिक अब्दुल रशीद (जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक), जावेद बागवान (शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी बदनापूर), बदनापूर तालुका काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी घनसावंगी, साईनाथ वाघ पाटील (चेअरमन), लक्ष्मण बोंबले (सचिव-जिल्हा काँग्रेस कमिटीओबीसी जालना), जावेद पटेल (तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी अंबड अल्पसंख्याक), योगेश पवार (उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी अंबड ओबीसी), वैजीनाथ डोंगरे पाटील (जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जालना),
तसेच बळीराम शेळके पाटील, विनायक कापरे पाटील, कोंडीराम गायकवाड, जावेद पटेल, डॉक्टर जगन वैराळ, विलास गायके, राजू कांबळे, भीमराव मगरे, सुभाष बारवाल, आबासाहेब काकडे, उद्धव काळवणे, अंकुश काळवणे, नारायण वाघ, भागचंद काळवणे, सिताराम बोंबले, शंकर दिवटे, रामेश्वर पेटारे, राम फाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.