Elgaar News :-
Government Orders to Officials : सर्वसामान्य नागरिक अनेकदा कामानिमित्त विविध शासकीय कार्यालयात जात असतात. आपले काम लवकर व्हावे अशी नागरिकांची इच्छा असते, त्यामुळे ते कार्यालयात गेल्यावर संबंधित अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची माहिती घेत असतात.
परंतू कार्यालयात गेल्यावर शक्यतो त्यांना कोणत्या कामासाठी कोणता कर्मचारी आहे हे माहित नसते, छोट्याशा कामासाठी तासनतास ताटकळत बसावे लागते, कार्यालयात गेल्यावर संबंधित कामासाठी कोणता अधिकारी किंवा कर्मचारी आहे हे माहित नसल्यामुळे नागरिकांची अडचण होते.
शासनाने यापूर्वीच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शासन परिपत्रक काढले होते, परंतू परिपत्रकानुसार सूचनांचे पालन करण्यात येत नव्हते, मात्र आता शासनाने नवीन जीआर काढला असून त्यानुसार राज्य शासनातील प्रत्येक कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना नवीन परिपत्रकानुसार सूचनांचे पालन करावे लागणार आहे.
नवीन जीआर मध्ये काय ?
शासनाने काढलेल्या नवीन जीआर नुसार नागरिक विविध कामासाठी शासकीय कार्यालयात गेल्यास संबंधित अधिकारी यांचे नाव व पदनाम असलेले ओळखपत्र दिसून येत नाही, त्यामुळे कोणता अधिकारी किंवा कर्मचारी कोणत्या पदावर कार्यरत आहे हे नागरिकांना माहित होत नाही.
Government Orders to Officials
ओळखपत्राबाबत एखाद्या नागरिकाने विचारणा केली तर संबंधित अधिकारी – कर्मचारी ओळखपत्र दाखवित नाहीत, मात्र आता राज्य सरकारच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात असतांना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे लागणार आहे.
जे अधिकारी / कर्मचारी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागात लावणार नाहीत, त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे, यासाठी वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या नियमाचा पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मासिक अहवाल वरिष्ठांकडे तसेच सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
त्यामुळे यापुढे कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र कार्यालयात असतांना दर्शनी भागात लावणे आवश्यक करण्यात आले आहे, ज्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आपल्या कामाशी संबंधित अधिकारी – कर्मचारी शोधणे सोपे जाणार आहे, अर्थात काही अंशी का असेना दिलासा मिळणार आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.