Your Alt Text

पिंपरखेड बु. येथील अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्‍यासाठी पोलीस प्रशासन एखाद्या मुहुर्ताची वाट पाहत आहे का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
एखाद्या गावातील महिला अनेक वर्षांपासून पोलीसांमध्‍ये तक्रार व निवेदन देवून सुध्‍दा पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसेल तर सर्वसामान्‍य नागरिकांनी याचा काय अर्थ घ्‍यावा असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील पिंपरखेड बु. या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे, तसेच गल्‍लीबोळात दारूच्‍या दुकाना तसेच गावाशेजारी चारही बाजुंनी धाबे झाले आहेत, सदरील धाब्‍यांवर सुध्‍दा दारू विक्री केल्‍या जाते, गावात मटका, पत्‍याचे क्‍लब, सोरट असे अनेक अवैध धंदे बोकाळले आहेत. तरूण पिढी यामुळे बरबाद होत असून दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्‍त झाले आहेत. अवैध दारू व अवैध धंद्यामुळे गावातील महिला व शाळकरी मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशा सर्व बाबींचा उल्‍लेख करून वेळोवळी गावातील महिलांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले परंतू अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

गावात गल्‍लीबोळात खुलेआम दारू विकल्‍या जाते, दारूड्या लोकांमुळे महिला व मुलींना रस्‍त्‍याने येणे जाणे सुध्‍दा मुश्किल झाले आहे, दारूडे लोक मुलींची छेड काढण्‍याचा प्रयत्‍न करतात, शिट्या वाजवतात, अश्‍लील चाळे करतात, शिव्‍या देतात त्‍यामुळे महिलांसह शाळेत जाणाऱ्या मुलींना प्रचंड त्रास होत आहे असल्‍याचे निवेदनात नमूद आहे.

सामाजिक कार्यकर्त्‍या सुरेखा पाटील व इतर महिलांनी यापूर्वी दि.09/08/2017, दि.04/07/2019, दि.09/11/2020, दि.16/07/2024 अशा प्रकारे वेळोवेळी पोलीस प्रशासनाला निवेदन देवून तक्रारी केल्‍या आहेत, विशेष म्‍हणजे पोलीस प्रशासनाला निवेदनासोबत ग्रामपंचायतचा ठराव सुध्‍दा देण्‍यात आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठलीहीच कार्यवाही झालेली नाही असेही निवेदनात नमुद आहे.

पोलीस प्रशासनाकडून अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई तर सोडाच उलट तक्रार करणाऱ्या सुरेखा पाटील यांना अवैध धंदे करणाऱ्यांकडून धमक्‍या देण्‍यात आल्‍या. अर्थातच यापुढे सुध्‍दा त्‍यांच्‍या जीवीतेला धोका असल्‍याचे सुरेखा पाटील यांनी सांगितले. त्‍यामुळे पोलीस प्रशासनाने किमान आता तरी सदरील अवैध दारू विक्री आणि इतर अवैध धंदे तात्‍काळ बंद करावेत अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!