एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
पश्चिम बंगाल च्या कोलकाता मधील आर.जी.कार हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरवर अत्याचार व हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने दि.17 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. सदरील संपात कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील डॉक्टरांनी सुध्दा सहभागी होत घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
सदरील संपामुळे रूग्णालयांमध्ये 24 तास वैद्कीय सेवा स्थगित करण्यात आली आहे. दि.17 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑगस्ट सकाळी 6 पर्यंत हा संप पुकारण्यात आला आहे. देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
कुंभार पिंपळगांव येथील डॉक्टरांनी सदरील संपात सहभागी होत 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दि.17 रोजी सकाळी शहरातील सर्व डॉक्टरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येवून सदरील घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी डॉ.जीवन तौर, डॉ.कासट, डॉ.राजुरकर, डॉ.माजीद, डॉ.कौस्तुभ देशमुख, डॉ.आर्दड, डॉ.शिकारे, डॉ.रूपेश लाहोटी, डॉ.कुरेशी, डॉ.कोरडे, डॉ.आनंदे, डॉ.कोकणे, डॉ.अजय आस्कंद यांच्यासह काशिनाथ घुमरे यांची उपस्थिती होती.