Your Alt Text

तहसील कार्यालय घनसावंगी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवनियुक्त पदाधिकारी सत्कार व आढावा बैठक संपन्न

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयात दि.15 ऑगस्ट 2024 रोजी आढावा बैठकीसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या घनसावंगी विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी सतीश घाटगे पाटील तर अशासकीय सदस्य म्हणुन ज्‍येष्‍ठ नेते रविंद्र तौर व तात्यासाहेब चिमणे यांची अशासकीय सदस्य म्हणुन निवड राज्य सरकारने केली आहे.

यात तहसिलदार घनसावंगी, मुख्याधिकारी नगरपंचायत तिर्थपुरी, घनसावंगी, गट विकास अधिकारी घनसावंगी, प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास प्रकल्प घनसावंगी हे पदसिद्ध सदस्य असणार आहे. या सर्वांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले व घनसावंगी तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला.

जास्तीत जास्त लाभार्थ्‍यांना मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ कसा देता येईल या अनुषंगाने रविंद्र तौर (जिल्हा नियोजन समिती सदस्य जालना) यांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्यावेळी समिती अध्यक्ष सतीश घाटगे पाटील, सदस्‍य रविंद्र तौर, तात्यासाहेब चिमणे, तहसिलदार योगीता खटावकर, गट विकास अधिकारी अमित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण कंटुले, ग्रा.स. राधाकृष्ण भालेकर, फिरोज कुरेशी, दत्तामामा तौर, गणेश कंटूले, रहिम पठाण यांच्‍यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tatya Final 001

इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!