एल्गार न्यूज विशेष :-
Majhi Kanya Bhagyashree Yojana : शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले असून आता मुलींच्या जन्मानंतर एक लाख रूपये देण्यात येणार असून त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सदरील निर्णय मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
Majhi Kanya Bhagyashree Yojana
सदरील योजने संदर्भात याआधी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी घोषणा केली होती, सदरील योजनेचे नाव “माझी कन्या भाग्यश्री योजना” असे आहे. 1 एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून त्यांचा जन्मदर वाढडविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे इत्यादी आहे.
लाभ कसा मिळेल ?
पिवळ्या व केशरी रेशनकार्डधार कुटुंबास मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रूपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रूपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रूपये, 11 वी मध्ये गेल्यावर 8 हजार रूपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रूपये अशा रितीने त्या मुलीस एकूण 1 लाख 1 हजार रूपये इतका लाभ मिळणार आहे.
सदरील योजने अंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबास जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडीलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना लाभ मिळेल, जुळ्या दोन्ही मुलींना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.