Your Alt Text

घनसावंगी तालुक्‍यातील प्रश्‍न केव्‍हा मार्गी लागणार ? जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत सदस्‍य रविंद्र तौर यांनी केला प्रश्‍नांचा भडीमार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील महत्‍वाच्‍या प्रश्‍नांकडे विविध विभागांचा होत असलेला दुर्लक्ष पाहता सदरील प्रलंबित प्रश्‍न केव्‍हा मार्गी लागणार असा सवाल जालना जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य तथा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र तौर यांनी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत केला.

जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील सभागृहात दि.25 रोजी “जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक” पार पाडली. या बैठकीला अतुल सावे (पालकमंत्री जालना) आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरंट्याल, जालना जिल्‍हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जि.प.च्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षाताई मीना, पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य रविंद्र तौर, अण्णासाहेब चितेकर, अन्वर मिर्झा बेग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद जालना येथील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते. या महत्त्वाच्या बैठकीमध्ये जालना जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य रविंद्र तौर यांनी जालना जिल्हा व घनसावंगी तालुक्यातील विकास कामाबद्दल व सर्वसामान्‍य जनतेच्‍या अनेक गंभीर प्रश्नावर भाष्य केले. यामध्ये

(1) घनसावंगी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी वारंवार गैरहजर असतात. त्‍यामुळे अनेक ग्रामपंचायती व लोकांची कामे खोळंबली आहेत, तसेच कार्यालयातील अनेक अधिकारी सुध्दा कार्यालयात उपस्थित नसतात‌, त्‍यामुळे जनतेची कामे कशी होणार व विकास कशा साधणार ? विहीर मंजूरीच्‍या कामातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्‍टाचार झालेला आहे.

(2) घनसावंगी तालुक्यातील कुं.पिंपळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून चालु आहे. प्रा.आरोग्य केंद्र हे 2 खोल्यांमध्ये चालते तिथे पूर्णतः लोकांना समाधान कारक सुविधा मिळत नाही ही गंभीर समस्या आहे यावर तातडीने मार्ग काढणे गरजेचे आहे.

(3) कुं.पिंपळगाव येथे पोलीस चौकी आहे, 20 ते 22 गावांचा कारभार या चौकीवर आहे. चौकीत 2 ते 3 पोलीस कर्मचारी असतात आणि विशेष म्हणजे तेथे असणारी पोलिस व्हॅन सुध्दा काढुन दुसऱ्या ठिकाणी दिली आहे. या परिस्थिती मध्ये अनेक गावे त्यांना बघायची आहेत ते सुध्‍दा पोलिस व्हॅन नसताना, हे कसे शक्य आहे ? यामुळे पोलिस स्टेशन व व्हॅनची ची अत्‍यंत गरज आहे. खरं तर येथे पोलीस ठाणे होणे गरजेचे होते परंतू काही कारणामुळे ते झाले नाही. या गंभीर प्रश्‍नाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

(4) उक्कडगाव (ता.घनसावंगी) हे पर्यटनस्थळ असून येथे मोठ्या संख्‍येने भाविक भक्‍त दर्शनासाठी येत असतात, येथे भक्त निवास करिता निधी उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

(5) भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे खडी आईचे प्रसिद्ध मंदिर आहे. तर दर्शनासाठी भरपूर भाविक भक्त येतात तर तेथील परिसरात स्ट्रीट लाईट लावणे गरजेचे आहे यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

(6) जालना जिल्ह्यात दुष्काळचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे. वर्षानुवर्षे अनेक गावांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर असतो, पाण्‍याचा प्रश्‍न मार्गी लावण्‍यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर जावून परिस्थिती पहावी लागेल आणि त्‍यानुसार उपाययोजना कराव्‍या लागतील.

(7) घनसावंगी तालुका क्रिडा संकुल बंद अवस्‍थेत आहे, त्‍याचा काहीही उपयोग होत नाही, हे क्रिडा संकुल विभागाने सुरू करावा अथवा एखाद्या संस्‍थेमार्फत हे क्रिडा संकुल सुरू करून खेडाळूंसाठी उपलब्‍ध करून देणे आवश्‍यक आहे.

(8) घनसावंगी तालुक्‍यातील बहुतांश अधिकारी हे कार्यालयात थांबत नाही, शिवाय भेट झाली तर जनतेशी निट बोलत नाहीत. सर्व कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबून जनतेची कामे वेळेवर करावीत.

(9) कुंभार पिंपळगांव येथील राष्‍ट्रीय पेयजल योजना 2011 साली मंजूर झाली परंतू त्‍या योजनेचे काम पूर्ण झाल्‍याचे कागदोपत्री दाखवण्‍यात आले, अर्थातच सदरील योजनेचे पाणी अद्याप नागरिकांना मिळाले नाही. त्‍याचीही चौकशी होणे आवश्‍यक आहे.

(10) शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी येवूनही त्‍याचा फायदा जनतेला का होत नाही ? यंत्रणेच्‍या दुर्लक्षामुळे अपेक्षित विकासकामे व योजनांची अंमलबजावणी होतांना दिसत नाही, याचाही विचार करणे आवश्‍यक आहे.

11) उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी गोदावरी नदीवर शिवणगाव येथे पाणी अडवण्‍यासाठी जे बॅरेजेस बांधले, त्‍यामुळे अडवलेल्‍या पाण्‍यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लावला आणि कारखाने चालू लागले आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्‍नती झाली, याच बरोबर गेवराई तालुका आणि घनसावंगी तालुका दळणवळणासाठी महत्‍वाचा झाला आहे, परंतू शिवणगांव ते बॅरेजेस हा रस्‍ता रस्‍ता अद्याप पूर्ण झालेला नाही. तो होणे गरजेचे आहे.

असे अनेक महत्‍वाचे प्रश्‍न यावेळी रविंद्र तौर यांनी मांडले, सदरील बैठकीत उपस्थित केलेल्‍या सर्व प्रश्‍नांचे मान्‍यवरांनी तातडीने निराकरण करावे अशी मागणीही जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य रविंद्र तौर यांनी केली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!